Rule Change :केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करतील. या दिवशी अनेक नवीन घोषणा आणि करांमधील बदल स्पष्ट होतील.
ADS
एलपीजी (LPG) सिलेंडरच्या किंमती
- घरगुती गॅस (14 kg): युएईच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यामुळे आणि बजेटच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात होण्याची दाट शक्यता आहे. सरकार सर्वसामान्यांना ‘गिफ्ट’ देण्याची चिन्हे आहेत.
- व्यावसायिक गॅस (19 kg): व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीतही बदल होऊ शकतात. यापूर्वी दिल्लीत यात १४.५० रुपयांची कपात होऊन किंमत १८०४ रुपयांवर आली होती.
- CNG-PNG आणि ATF: इंधनांच्या दरांवरही या बदलांचा परिणाम दिसून येईल.
पान मसाला आणि सिगारेट महागणार
तंबाखूजन्य पदार्थांचे शौकीन असलेल्या लोकांसाठी हा मोठा झटका असू शकतो:
- पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांवर नवीन शुल्क (Cess) आकारले जाणार आहे.
- यावर आता आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर (Health and National Security Cess) सोबतच अतिरिक्त जीएसटी दर लागू होतील.
फास्टॅग (FASTag) नियमात बदल
- NHAI ने कार, जीप आणि व्हॅनसाठी फास्टॅग व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण केली आहे.
- या प्रक्रियेसाठी आता सक्ती केली जाणार नसल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बँकांना सुट्ट्या
- फेब्रुवारी महिन्यात शनिवार, रविवार आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांसारख्या विविध कारणांमुळे बँका एकूण १० दिवस बंद राहतील. त्यामुळे तुमची बँक संबंधित कामे आधीच नियोजित करणे सोयीचे ठरेल.
ADS






